गुरुवार, २३ मे, २०१३

माझं आयुष्य….

माझं आयुष्य…. 
कधी कुणा न कळलेला न उमगलेल 
अवघड अश्या शब्दात अडकलेलं 
जणू सागराच्या लाटांनसारख काहीसं 
कधी उफाणेल याचा वेध नसलेलं 
हवामान खात जसा नेहमीच चुकव
तसाच सागळच काही विस्कटलेल 
आठवणी चा कल्लोळ भारती सारखा 
ना अंत ना अर्थ त्या भावनांना 
दगडावर आपटून विखुरलेल्या थेंबासारखं 
ना  दु:ख ना व्यथा ना गोडवा त्यांसी 
किनार्या जवळ असूनही दूर असा 
मनात ओढ असूनही निशब्द असा … 

कळतात का गं तुला मझ्या कवितेतले शब्द

कळतात का गं तुला मझ्या कवितेतले शब्द 
अर्थ जसा विखुरलेला थेंब तुझ्या आसवांचा 

तुझ्या असण्याचे पुरावे आहेत माझे शब्द 
न उमगलेला कोडं आहे तुझ्या ओल्या डोळ्याचं 

पाठमोरी अशी तुझी सावली आहेत माझे शब्द 
जणू हरवलेली नात्याची  रेशीम गाठच ते 

तुझ्या-माझ्यातल्या अंतरचे उत्तर आहेत शब्द  
गर्दीत एकटे कारणारे सोबती तुझे नि माझे 

माझ्या मनाचा कल्लोळ आहेत माझे शब्द 
जणू निघताना अडखळनार्या पाउलांची ठेच 

उमगलच कधी तुला माझ्यातली तूच "शब्द" ते 
नाहीच तर आयुष्याच्या डायरीतून निखळलेलं  "एक " पानच ते…. !

गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

एक परीराणी

रुसून बसली एक परीराणी 
फुगले गाल राग त्या नयनी 
हळूच हसे ती चोरून नजरा 
कसला हा तिचा अनोखा नखरा 

शब्दही अडले तिच्या ओठी 
नाजाने कशी हि सुटेल गोची 
हळवा राग तिचा मझ्यावर 
कोरला आघात हा मी मनावर 

रुसलो मग मी हि जरासा 
अट्टाहास दाखिवला काहीसा 
फिरवल्या नजरा तिच्यावरून 
निघालो एकलाच त्या मार्गावरून 

अखेर फुटला बांध तिच्या ओठांचा 
अनावर अश्रू तिला त्या क्षणाचा 
मिटून नजरा हळूच शिरली कुशीत 
गहिवरलो काहीसा मीही त्या खुशीत 

मावळला खेळ हा रूसव्याचा 
सावळा रंग त्या क्षणी मनांचा 
अबोल काहीसा खेळ सावल्यांचा  
मनी मात्र गंध फक्त तिच्या प्रीतीचा
                             ---रामचंद्र म. पाटील

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

अश्रु

अश्रुंचे धार अजून ओसंडत होते 
ओठांचे थरथरणे तेवत होते 
शमले नव्हते अजूनही हे नाते 
जणू धागे क्षणाचे तुटले नव्हते 

हाताना भास होते तुझ्या स्पर्शाचा 
मनाला आधार होता तुझ्या हास्याचा 
सवयी होत्या तुझ्या सहवासाच्या 
जणू हळवे मन अजूनही भरले नव्हते 

अखंड वाट पाहत राहायच होता 
तुला आठवून हसायचं होता 
पाऊलवाटाणा टिपायच होता  
तुझं जाण अजून मान्य नव्हते
                        ---रामचंद्र म. पाटील


सोमवार, १४ जानेवारी, २०१३

तू असलीस कि

तू असलीस कि मनी एक वेगळाच नाद असतो 
गर्दीत हि बाग फुलावी असा प्रेमळ आभास असतो 
कटू उन्हातही तुझ्या सावलीत क्षणभंगुर असतो 
मनी मात्र तुझ्या आठवणीचा कल्लोळ असतो 

तू असलीस कि स्वप्नाची बहर फुललेली असते 
मिठीत तुझ्या मझी दुनिया सामावली असते  
नाजाने एक अबोल दुनिया मनी वसलेली असते
क्षणा क्षणाला ओठांवर एक वेगळीच कहाणी असते

तू असलीस कि   दुःख जणू ठेगणे वाटते  
सुखं चार क्षणाचं मज आकाश्पारी वाटते 
स्वप्नातले घरटे कळीपारी फुलवावे वाटते 
दुरुनी फक्त तुलाच निरखून पाहावे वाटते 

तू असलीस कि तुझ्यातच विरघळून जातो 
आठवून क्षण विरहाचे क्षणात विसकटून जातो 
आपसूक मग मी माझ्यातच हरवून जातो 
असून नसलेला मी पुन्हा एकांत शोधत जातो
                                              ---रामचंद्र म. पाटील

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

एक मी

एक रस्ता ............तुझ्या पाऊलांसाठी नेहमीचाच तरसलेला
एक संध्याकाळ ....तुला सामवून न घेताच विझलेली
एक रात्र .............ओसाड तुझ्याच आठवणीत सरलेली
एक पाऊस ..........तुझ्या स्पर्शासाठी सतत बरसणारा
एक वादळ ...........तुझ्या स्मरणाच कण घेत घोंगावणारा
एक पाऊल ...........तुझ्याविना नेहमीच आडखळनांर
एक मन ...............तुझ्याशिवाय कुणाशीच न जुळणारं
एक आग .............तुझ्यासाठी सतत जळत राहणारी
एक वादळ ...........तुझ्या स्मरणाच कण घेत घोंगावणारा
एक मी ...............तुला स्वप्नाच्या दुनियेत सजवणारा
एक मी ...............तुझ्याविना इथे वावरूनहि नसणारा
एक मी ...............मनसोक्त तुझ्यात भिजूनही कोरडा
एक मी................फक्त मीच तुझ्याविना , तुझ्यातून दूर होताना...एक मी ...
                                                                                           ---रामचंद्र म. पाटील